सांगोला – सांगोल्यातील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये रांगोळी, हस्ताक्षर स्पर्धा तसेच देशभक्तीपर संगीत खुर्ची उत्साही वातावरणात पार पडली. या मध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे आयोजन मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षकांनी उत्कृष्ट नियोजन केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात होणार असल्याची माहिती प्रशालेतील स्पर्धा समितीच्या वतीने देण्यात आली.