बार्शी – ऑगस्ट महिन्यासह सप्टेंबरचा निम्म्याहून अधिक कालावधी उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने बार्शी तालुक्यातील खरीप पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच कर्जमाफीसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) च्यावतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन
नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख पांडुरंग पाटील, नगरसेवक महेदिमियां लांडगे, संजीवनी बारंगुळे, काँग्रेसचे तालुका संघटक अविनाश शिंदे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, विष्णू ढेकणे, मोहन गरजे, निलेश पायघन, सुहास बालके, आकाश भालके, शशिकांत बिडकर, उल्हास भालके, संदीप चौधरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
Post Views: 31