सोलापूर : दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एक दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना सोलापूरच्या डीआरएम कार्यालया जवळ शनिवारी मध्यरात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान घडली.
विजय कुंदन जाधव (वय 38 वर्ष, राहणार अभिषेक नगर ,हॉटेल आंबेसीडर जवळ सोलापूर) असे मयत मोटरसायकल स्वराचे नाव आहे. ते दुचाकीवरून रेल्वे स्टेशन ते सात रस्ता कडे जात असताना अपघात झाला. यात जाधव बेशूध्द झाले. त्यांना उपचारासाठी सदर बाझार पोलिस ठाण्याचे हवालदार मोरे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
विजय जाधव हे गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच सोलापूर विकास मंचचे सदस्य होते. विविध सामाजिक आणि नागरी प्रश्नांचा अभ्यास असलेल्या जाधव यांनी सोलापूर जिल्ह्याचे तापमान कमी करण्याच्या उद्देशाने ‘मिशन ३८’ हा उपक्रम सुरू केला होता. सोलापूरच्या विमानसेवा, बेरोजगारांना रोजगार, उड्डाणपूल यांसह विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. शासन दरबारी नागरिकांच्या समस्या मांडत सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिले.
Post Views: 14