सोलापूर – चंद्रपूर येथे पार पडलेल्या ४५ व्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या संघाने सातवे स्थान पटकावले. या कामगिरीच्या बळावर मंगळवेढा येथील जवाहर विद्यालयाच्या जय राजेंद्र भेंकी याची २ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत छत्तीसगड येथे होणाऱ्या ४५ व्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंचे सोलापूर जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश भुतडा, सचिव राजेंद्र माने, शब्बीर शेख , मंगळवेढा एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक मिलिंद कुलकर्णी यांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
सोलापूर संघ आणि मार्गदर्शक:
श्रेयश शिवकुमार स्वामी (कॅप्टन), जय राजेंद्र भेंकी,अतिश संदीप भालेकर,स्वराज योगेश भगरे, जयदीप पांडुरंग गवळी, सृजन प्रशांत म्हेत्रे, शौर्य मामासाहेब गुंड, विवेक राजकुमार कोकरे, प्रतीक खंडू कोकरे, सिद्धार्थ विनायक बोमाण्णा, व्यवस्थापक : राजेंद्र माने आणि मार्गदर्शक : शिवकुमार स्वामी.






















