सोलापूर : जैन गुरुकुल प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूरची विद्यार्थिनी चिरंजीव ज्योती कृष्णदेव खंडागळे हिची सोलापूर जिल्ह्यातून पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चिरंजीव ज्योती खंडागळे ही जैन गुरुकुल प्रशालेची विद्यार्थिनी आहे.
महाराष्ट्र्शासन यांचेवतीने सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत तिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनीला प्रशालेतील क्रीडा शिक्षक सुभाष उपासे, संजय पंडित, प्रसन्न काटकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल श्री ए. प.दि .जैन पाठशाळेचे सचिव डॉ. रणजीत गांधी, विश्वस्त पराग शहा, भूषण शहा तसेच प्रशालेचे प्राचार्य राजकुमार काळे ,उपप्राचार्य शैलेश पांगळ , पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे इत्यादी मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. ज्योती खंडागळे ही अण्णासाहेब भालशंकर यांची नात आहे.
Post Views: 12