सांगोला – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा २०२६-२७ (मुले व मुली) यांचे आयोजन सांगोला महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव साहेबराव ढेकळे यांच्या हस्ते झाले. याचे
प्रास्ताविक डॉ.मालोजी जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद लोखंडे, आभार प्रदर्शन डॉ.जगदीश चेडे यांनी केले. या स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयांमधून मुले व मुलींचे मिळून १४ संघांनी सहभाग घेतला. खेळाडूंची निवड डॉ.स्मिता सुरवसे, डॉ.महेश ढेंबरे, डॉ.प्रशांत तांबिले यांनी केली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने विशेष परिश्रम घेतले.