बार्शी – आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन व जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्यावतीने कै. कस्तुरबा गांधी मूकबधिर निवासी शाळा, खांडवी, ता. बार्शी येथे विद्यार्थ्यांसाठी दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून दंत तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता, दातांची निगा व मौखिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना फळे व नॅपकिन रुमालाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमास लायन्स क्लब बार्शी रॉयलचे अध्यक्ष ला. मंगेश बागुल, ला. डॉ. तेजस लाड, ला. डॉ. किरण लाड, ला. शशिकांत बारबोले तसेच क्लबचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने राबविण्यात आलेल्या या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमाचे शाळेच्यावतीने कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा क्लबचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Post Views: 31