बार्शी – शहर अन् तालुक्यात यावर्षी बारा दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर गणेशमूर्ती विसर्जन तयारी बार्शी नगरपरिषदेने दोन तलावात केली असून हजारो गणेशमूर्तीचे विसर्जन दरवर्षीप्रमाणे होणार आहे. प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे नगरपरिषद कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून शहरातील दहा ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये पांडे चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ शॉपिंग सेंटर, एसटी बसस्थानक चौक, संकेश्वर उद्यान, एकविराई चौक, उत्रेश्वर नाका मंगळवार पेठ, श्रीमान झाडबुके शॉपिंग सेंटर, अण्णाभाऊ साठे चौक, रमाई चौक येथे नागरिकांच्या गणेश मूर्तीचे संकलन करण्यात येईल.
सुभाषनगर भागातील गणेश तलाव व कांदलगाव रस्त्यावरील राऊत तलाव येथे संकलित गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल. नागरिकांनी कृत्रिम विसर्जन हौदात गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. तलाव अथवा विहिरीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित करु नये; प्रदूषणमुक्त सण साजरा करावा, असेही मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांनी स्पष्ट केले.
Post Views: 29