सोलापूर – श्री बसवेश्वर मराठी विद्यालय विडी घरकुल सोलापूर येथे सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळात सोलापूर विद्यापीठाच्या वतीने व क्विक हिल फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेमध्ये सायबर सुरक्षा मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान घेण्यात आले.
याप्रसंगी पाचवी ते सातवी चे सर्व शिक्षक व प्रभारी मुख्याध्यापिका लंगोटे यांची उपस्थिती होती. चिप्पा यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले व पाहुण्यांची ओळख करून दिली तर जामदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा उपक्रम मार्गदर्शिका मारपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने आपल्या शंका विचारल्या व कार्यक्रमाविषयी फीडबॅक देखील दिला.




















