बार्शी – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोजर इंग्लिश स्कूल माध्यमिक विभागात गणेशोत्सवा निमित्ताने कै. माणिक बाबुराव उपरे पेंटर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या गणेश मूर्ती रंगभरण व डेकोरेशन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेत ७० मुलांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी बार्शीतील प्रसिद्ध मुर्तीकार अनंत उपरे यांच्याकडून या मूर्ती देण्यात आल्या होत्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे आयोजक अनंत उपरे, त्यांची कन्या यांचे बरोबरच युवा उद्योजक अर्जुनसिंह बारबोले व बार्शीतील ‘सरपंच द पॉवर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक/अभिनेते महादेव जाधव तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संदीप पोळ उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण अनंत उपरे, अर्चना शिंदे यांनी केले.
या स्पर्धेत ५ वी ते ७ वी या गटातून अलिझा आतार हिने प्रथम क्रमांक, प्रतिक मुंढे द्वितीय, शिवराज घनाते याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. ८ वी ते १० वी या गटातून हर्षदा शेळके प्रथम, प्रांजल वाघमारे द्वितीय तर अबोली बारंगुळे हिने तृतीय क्रमांकांचे पारितोषिक पटकावले. अरुंधती चांदणे व जयदीप शिंदे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेतील विजेत्या मुलांना अनंत उपरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. अशा स्पर्धांमधून मुलांच्या कलांचा विकास होतो, असे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले. महादेव जाधव यांनी प्रशालेतील कलाकारांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात कै. आण्णाजी बारबोले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सोजर टॅलेंट सर्च’ परिक्षेतील यशवंत विद्यार्थी मारुफ शेख, समन मुजावर, वैष्णवी गुंड, कृष्णा इंगळे, साद शेख, केदार गवळी या यशस्वी विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले. या परिक्षेचा निकाल मुख्याध्यापक संदीप पोळ यांनी जाहीर केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड यांनी केले.
Post Views: 8