मंगळवेढा – बालरंगभूमी परिषद,मुंबई यांचे वतीने सोलापूर केंन्द्रावर संपन्न झालेल्या जल्लोष लोककला या स्पर्धेत मंगळवेढ्याचे बालकलाकार रुद्रप्रताप जाधव-ओवी, अभयसिंह जाधव-पिंगळा, अंबादास नलावडे-संबळ वादन, श्रुती पवार-अंबाईचा गोंधळ नृत्य, प्रज्वलिता पवार-गोंधळ नृत्य, श्रीरंग पवार-धनगरी गीत हे कलाप्रकार उत्कृष्टरित्या सादर करून सोलापूरकरांची वाहवा मिळवली.
सोलापूर केंद्रावर या स्पर्धेत एकूण 216 स्पर्धकांनी सहभाग नोंदवून मंगळवेढा बालरंगभूमी परिषद शाखेच्या अभयसिंह जाधव न.पा.शाळा नं. 4 व अंबादास नलवडे,जवाहरलाल हायस्कूल,मंगळवेढा या बालकलाकारांनी पारितोषिके पटकावली.
या यशस्वीतेबद्दल बाल रंगभूमीपरिषद मंगळवेढा शाखेच्या अध्यक्षा प्रा. तेजस्विनी कदम, कार्याध्यक्ष अशपाक काझी,अ.भा.नाट्य परिषद मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष डॉ.सुभाष कदम ,प्राचार्य रवींद्र काशिद,बालाजी शिंदे, मुख्याध्यापक मिलिंद कुलकर्णी , मुख्याध्यापक गंगाधर कोळी,अर्जुन आवताडे, संजय चेळेकर,यतिराज वाकळे आदी मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धकांसाठी शिवकुमार स्वामी ,रमेश गदळे,वैशाली पवार,गणपत पवार,नागन्नाथ जाधव,पुंडलीक पवार आदिंनी परिश्रम घेतले.
Post Views: 7