मोडनिंब – पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे त्रस्त झालेल्या तुळशी (ता. माढा) येथील ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा निषेध नोंदवला आहे. तुळशी गावातील पाण्याच्या टंचाईने त्रस्त झालेले ग्रामस्थ गाव विक्रीला काढत आहेत. यासाठी त्यांनी ‘तुळशी’ गाव विकणे आहे असा एक फलकही लावला आहे. मात्र गावाची किंमत केवळ पाणी एवढीच ठेवण्यात आली आहे. या फलकावर अन्याय आणखी किती काळ सहन करायचा ? असा सवालही उपस्थित करून लिहिले आहे. तुळशीचे सरपंच शरद मोरे यांनी सांगितले, “गावात दरवर्षी पाण्याची टंचाई असते. ‘गाव विक्रीसाठी, किंमत-पाणी’ असा फलक लावून सरकारचे लक्ष या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माढा तालुक्यातील तुळशी गावाची लोकसंख्या सुमारे ७ हजार आहे. अपूर्ण सीना-माढा उपसा सिंचन प्रकल्पामुळे हे गाव अनेक वर्षांपासून टँकरवर अवलंबून आहे. प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली आणि आंदोलने केली. तरीही पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. तुळशीतील बहुतांश लोक शेती आणि पशुपालनाशी संबंधित आहेत. पाण्याच्या संकटाचा त्यांच्या उपजीविकेवर वाईट परिणाम झाला आहे., या संकटाचा परिणाम लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला आहे. गावातील सुमारे 350 तरुणांचे विवाह होऊ शकलेले नसल्याचे तुळशीकरांनी सांगितले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















