सोलापूर : सेवा संकल्प अभियान तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी (१ ऑक्टोबर) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मनपा शाळा क्रमांक ६ येथील भौतिकोपचार केंद्र, जोड बसवण्णा चौक येथे करण्यात आले आहे.
शिबिरात दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार फिजिओथेरपी व उपचारही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शारीरिक हालचालींशी संबंधित अडचणी, आरोग्याच्या समस्या तसेच फिजिओथेरपीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि दैनंदिन जीवनातील शारीरिक अडचणी कमी व्हाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील दिव्यांग व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
—
Post Views: 24