सोलापूर -अज्ञात कारणावरून एका 18 वर्षीय तरुणाने शेतातील घरात छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदारफळ येथे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
प्रथमेश अनिल खरात (वय 18 वर्ष रा. बिबीदारफळ)असे मयत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह स्वतःच्या शेतातील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांच्या साह्याने त्याला फासातून सोडवून चुलते सुनील खरात यांनी येथील शासकीय रुग्णालयात रात्री साडेअकरा वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Post Views: 24