बार्शी – बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे आज शुक्रवारी सकाळी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, ऑ. सेक्रटरी आनंद पुनमिया संचालक प्रमोद भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावना व सुत्रसंचालन वाचनालयाचे संचालक प्रमोद भंडारी यांनी तर आभार प्रदर्शन ऑ. सेक्रटरी आनंद पुनमिया यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा. ग्रंथपाल सौ. शितल लुकडे, लिपीक विराज पतंगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.