सोलापूर : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत मनपा शाळा क्र. ६, भौतिकोपचार केंद्र, जोड बसवण्णा चौक येथे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत आरोग्य तपासणी व भौतिकोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त आश्लेषा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, विशाल माने, शिवराम मोटे तसेच मनपा शाळा क्र. ६ येथील भौतिकोपचार केंद्रातील डॉक्टर आदित्य झिपरे व शिक्षण विभाग कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरास उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.
शिबिरामध्ये सुमारे ७८ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींची आरोग्य तपासणी व भौतिकोपचार मूल्यांकन करण्यात आले. यावेळी आवश्यक उपचार, विविध व्यायाम व भौतिकोपचाराबाबत मार्गदर्शन तसेच आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले.ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सोलापूर महानगरपालिकेच्या सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहे.
—-
Post Views: 14