जेऊर – करमाळा येथे तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत श्री. राजेश्वर विद्यालय, राजुरीच्या तब्बल ५० विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांत सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली.
विद्यालयाच्या गुणवंत खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू
३ कि.मी. चालणे — १७ वर्षे वयोगट, मुली :
ज्ञानेश्वरी पांडुरंग खैरे — प्रथम क्रमांक
स्नेहल जयराम साखरे — द्वितीय क्रमांक
५ कि.मी. चालणे — १७ वर्षे वयोगट, मुले :
निलकंठ मारुती साखरे — प्रथम क्रमांक
प्रतीक बाळासाहेब मुळीक — द्वितीय क्रमांक
८० मीटर हर्डल्स — १४ वर्षे वयोगट, मुली :
दिव्या मारुती साखरे — द्वितीय क्रमांक
८० मीटर हर्डल्स — १४ वर्षे वयोगट, मुले :
प्रदीप ज्ञानदेव डुकरे — प्रथम क्रमांक
१०० मीटर हर्डल्स — १७ वर्षे वयोगट, मुली :
प्राची शहाजी दुरंदे — तृतीय क्रमांक
११० मीटर हर्डल्स — १९ वर्षे वयोगट, मुले :
विजय मोहन शिंदे — प्रथम क्रमांक
४०० मीटर हर्डल्स — १७ वर्षे वयोगट, मुली :
प्राची शहाजी दुरंदे — प्रथम क्रमांक
सिद्धी किरण शिंदे — तृतीय क्रमांक
४×४०० मीटर रिले — १७ वर्षे वयोगट, मुले :
प्रतिक बाळासाहेब मुळीक, समाधान मेहरबान रणदिवे, विजय मोहन शिंदे, विराज सुनील गरुड आणि अमोल लाला नाळे — तृतीय क्रमांक
४×४०० मीटर रिले — १७ वर्षे वयोगट, मुली :
प्राची शहाजी दुरंदे, सिद्धी किरण शिंदे, वैष्णवी श्रीकांत शिंदे, तनुजा गणेश हुंबे आणि सिद्धी शिवाजी शिंदे — द्वितीय क्रमांक
हॅमर थ्रो — १७ वर्षे वयोगट, मुले :
प्रतीक बाळासाहेब मुळीक — प्रथम क्रमांक
रेहान सलीम खान — द्वितीय क्रमांक
हॅमर थ्रो — १९ वर्षे वयोगट, मुली :
सिद्धी किरण शिंदे — द्वितीय क्रमांक
ट्रिपल जंप (तिहेरी उडी) — १७ वर्षे वयोगट, मुली :
सिद्धी शिवाजी शिंदे — प्रथम क्रमांक
गीता संपत राऊत — द्वितीय क्रमांक
ट्रिपल जंप (तिहेरी उडी) — १७ वर्षे वयोगट, मुले :
निलकंठ मारुती साखरे — प्रथम क्रमांक
समाधान मेहरबान रणदिवे — द्वितीय क्रमांक
या यशस्वी कामगिरीमुळे श्री. राजेश्वर विद्यालय, राजुरीच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाटचालीला आणखी बळ मिळाले आहे. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक शिक्षक श्री. मारुती साखरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली कोल्हे, संस्थापक सचिव लालासाहेब जगताप, प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तालुका क्रीडा समन्वयक लेफ्टनंट कर्नल प्रा. राम काळे, शिक्षक भरतीचे अध्यक्ष किशोर जाधवर, उपाध्यक्ष नितीनकुमार कांबळे, क्रीडाशिक्षक ईश्वर तोरडमल, सरपंच राजेंद्र भोसले, एकनाथ शिंदे, उदय साखरे, रवी गरुड, लखन दुरंदे, सागर सोनवणे, शुभम शिंदे तसेच राजुरी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
यावेळी सर्व यशस्वी खेळाडूंना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 22