सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी ३ सुवर्णपदके पटकावली.
त्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष विवेक चव्हाण, प्राचार्या डॉ. कलाश्री देशपांडे, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे माजी शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक संतोष गवळी, अधीक्षक सुनील राठोड, प्रा. नागनाथ पुदे, प्रा. विजय तरंगे, अनिल राठोड आणि केशव पाथरुट यांनी अभिनंदन केले.
सुवर्णपदक विजेते खेळाडू याप्रमाणे :
आरती दाडमोडे ( ६९ किलो), केतकी पाटील (७७ किलो), हार्दिक लबडे (७५ किलो ).




















