सोलापूर : ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप)च्या वतीने लेझीम सरावाचा शुभारंभ प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ येथे उत्साहात झाला. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. बुद्धवंदनेनंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात लेझीम सराव ताफ्याचा शुभारंभ करण्यात आला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात निघणाऱ्या मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांकडून लेझीमचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
यावेळी भारत बाबरे, सुखदेव इंगळे, इथॉस रियालिटी समूहाचे प्रमुख तुकाराम गायकवाड, नगरसेवक गणेश पुजारी, पुरुषोत्तम कसबेकर, राजकुमार कांबळे, अरविंद शेमाडे, प्रेमानंद लोंढे, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक एस. आर. पुजारी, शशिकांत टाकळीकर, मंडळाचे प्रमुख गौतम चंदनशिवे, एस.के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत (बॉस) कोळेकर, अॅड. विशाल मस्के, आरोग्य निरीक्षक जितेंद्र मोरे, पी.बी. ग्रुपचे अध्यक्ष गुड्डू शिंदे, धम्मपाल महिंदर्गीकर, मनोज थोरात, सिद्धांत सुर्वे, चंद्रकांत सोनवणे, भीमा शिंगे, अमित माने, संजय इंगळे, पॅडी शिंदे, मोजेस मंडेपोलू, भैय्या कापुरे, धन्ना कापुरे, उमर शेख, बंटी सरवदे, प्रतीक चंदनशिवे, बाळू शिंदे, भीमा इंगळे, अजय इंगळे, रंगा वाघमारे, धोंडीबा कापुरे, धीरज वाघमोडे, सुमित चंदनशिवे, प्रदीप गवळी, प्रथमेश सुरवसे, रवी मातोरोलू, मुना केशपागा, नाना कापुरे, सिद्धार्थ तळभंडारे, अक्षय मस्के, आशिष पात्रे, गौतम शिंदे, जयराज सांगे, समाधान सकट, रोहन तळभंडारे आदींसह पी.बी. ग्रुपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 26