सोलापूर – शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळानी नवरात्र उत्सव अत्यंत पावित्र्य व शांततेने साजरी करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त – विभाग 1 अरुण देवकर यांनी पुर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र मध्यवर्ती महोत्सव महामंडळाच्या उत्सव समिती कार्यालय उदघाटन प्रसंगी केले.
पूर्व विभाग नवरात्र महोत्सव महामंडळाच्या वतीने 2026 नवरात्र महोत्सवाच्या उत्सव समिती कार्यालय उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक अरुण देवकर यांच्या हस्ते व जेलरोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक विष्णू कारमपुरी, उत्सव समिती अध्यक्ष कलीम शेख, मुंबईचे शिवाजी रहाणे, प्रताप चव्हाण, दत्तात्रय माने, रमेश चौगुले, सुलेमान चामाकोरा, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
सदर प्रसंगी बालकिसन गोने, सुभाष अलकुंटे, इम्तियाज दर्जी, प्रभाकर मुनक्याल, अमर मॅकल, श्रीशैल भंडारी, प्रसाद जगताप, शंकर मंजेली, लक्ष्मण चीटमपल्ली, नरेश येलूर, अमोल कुलकर्णी, अक्षय चिलवेरी, सोमनाथ वन्नाल, विकी कारमपुरी, अक्षय नंदाल, शुभम कारमपुरी, शुभम वडेपल्ली, शिवा मामड्याळ,अजय कारामपुरी, प्रशांत जगताप, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी आदी उपस्थित होते.
पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महामंडळाच्या कार्यालयात उद्घाटन प्रसंगी पोलीस आयुक्त देवकर, जेलरोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील, विष्णू कारमपुरी, कलीम शेख व सर्व उपस्थित मान्यवर दिसत आहेत.























