बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे संपन्न झाल्या. स्पर्धा बाद व साखळी पद्धतीने झाल्या बाद पद्धतीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर संघाचा शिवाजी महाविद्यालयाने २.० अशा फरकांनी पराभव करुन सलग दुसन्या वर्षी यश संपादन केले.
पहिल्या साखळी सामन्यात डब्ल्यू. आय.टी महाविद्यालय सोलापूर संघाचा २.० अशा फरकांनी पराभव केला सलग दुसन्या साखळी सामन्यात सांगोला महाविद्यालय, सांगोला संघाचा २.० अशा फरकाने पराभव केला तिसऱ्या साखळी सामन्यात बी.पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी संघाचा २.० अशा गुणांनी पराभव करत सलग दुसन्या वर्षी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या संघाने अजिंक्य पद पटकावले.
विजयी संघात- वेदश्री बंडेवार, अर्पिता शिंदे, सिद्धी मस्के, नंदिनी तनपुरे, समीक्षा गाढवे यांचा समावेश होता यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारणी संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. बी.शेख, संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर, डॉ. विजयानंद निंबाळकर, डॉ. रामहरी नागटिळक, यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 28