अकलूज : कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी बालक्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील व स्पर्धा समितीचे प्रमुख सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी दिली.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने आतापर्यंत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, आट्यापाट्या स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, भव्य कुस्ती स्पर्धा, रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिरे असे विविध उपक्रम राबवले आहेत. तसेच गरजूंना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, यासाठी ‘रत्नाई’ मिठाई हा उपक्रमही ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर मंडळाकडून राबवला जातो.
याच परंपरेनुसार विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा होणार असून, त्यात बालगटापासून इयत्ता चौथीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
*स्पर्धेतील क्रीडा प्रकार*
लहान गट: डोक्यावर चेंडू घेऊन पळणे (४० मी.)
मोठा गट: धावणे (६० मी.)
इयत्ता पहिली: कमरेवर हात ठेवून उड्या मारत जाणे (४० मी.)
इयत्ता दुसरी: लंगडी घालत जाणे (४० मी.)
इयत्ता तिसरी: तीन पायांची शर्यत (४० मी.)
इयत्ता चौथी: पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे (४० मी.)
प्रत्येक गटासाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे नियोजन सहा मैदानांवर करण्यात आले असून, ४५ पंच कामकाज पाहणार आहेत.
नावनोंदणीसाठी संपर्क
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नावनोंदणीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील यांनी केले आहे:
रमेश गायकवाड – ९८६०८७६५३५
प्रशांत जगताप – ९६३७१७४१६७
हनुमंत किर्दक – ९६७३०३०३१८
इलाही बागवान – ९२७२३६५१३६
यावेळी मंडळाचे सचिव बिभीषण जाधव, स्पर्धाप्रमुख शिवाजी पारसे, गणेश करडे,भानुदास आसबे, संजय राऊत, अर्जुन बनसोडे, सर्व सदस्य व क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते.
Post Views: 15