सोलापूर : भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक १२ मध्ये मंडलाध्यक्ष, बूथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची आहे. सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून उमेदवारांची माहिती द्यावी. बूथनिहाय नियोजन, मतदारांशी थेट संपर्क आणि मतदानाबाबत जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजनबद्ध तसेच आमदार देवेंद्र कोठे यांच्या सूचनांनुसार प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी असेही महापौरांनी सांगितले.
बैठकीचे प्रास्ताविक नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी केले. प्रभाग १२ चे प्रभारी दिलीप पतंगे व प्रभारी माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी निवडणुकीच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष पदवीधर स्वप्निल मोरे, जळगाव जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष कृतिकाताई आफळे, महामंत्री पदवीधर किरण आढाव, महिला मोर्चा पदाधिकारी मायाताई सोनवणे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेविका सारिकाताई खजूरगी, BLA2 अभिषेक चिंता, त्रिमूर्ती बल्ला, संतोष म्हमाने, व्यंकटेश नंदाल, सुनील दाते, राजू चलमिट्टी, सागर बल्ला, सुरेश नल्ला, राज ईगोली, नरेश दाते, रामदास मगर, शिवाजी कोळी, महेश रोटे, राकेश अंबल, नारायण येरवा, विनायक अल्ली व रोहित नारायणकर उपस्थित होते.
—-
Post Views: 7