करकंब – सालाबाद प्रमाणे कनकंबादेवीचा छबिना गावातून पारंपारिक वाद्य वाजवीत फटाक्याच्या आतिशबाजीत कनकंबा चौक,बस स्थानक,म्हसोबा,शुक्रवार पेठ,धाकटी वेस,टिळक चौक,थोरली वेस या मार्गावरून काढण्यात आला.सोमवार पेठ येथील ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष व प्रमुख मानकरी अमरसिंह देशमुख,उजवलसिंह देशमुख अशोकसिंह देशमुख यांच्या वाड्यामधे पालखीचे विधिवत पूजन करून नवरात्रीची सांगता करण्यात आली.यावेळीअजितसिंह देशमुख, सुरेश देशमुख नामदेव देशमुख संजय देशमुख,दिलीप देशमुख पिंटू देशमुख,अशोक देशमुख व कनकंबा मातेचे असंख्य भक्तगण,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.