मोहोळ – सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी शिवारात ईरटीगा कार ची कंटेनरला मागून जोराची धडक लागून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागेवर आणि उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पनवेल येथून काहीजण ईरटीका कार क्रमांक एम एच ०४ / के.एल ५२२२ या गाडीने अक्कलकोट तुळजापूर देवदर्शनाला निघाले होते. तेलंगवाडी शिवारात डोंगरे वस्तीजवळ येताच रोडच्या कडेला मुरमाच्या साईड पट्टीवर उभ्या असलेला कंटेनर क्रमांक एन एल ०१ / एल १३७९ यास मागून जोराची धडक दिली. यात विलास भारंबे (वय ६६)शोभा विलास भारंबे (वय ६३ ) पार्थ तुषार भारंबे (वय ८ ) यांचा जागेवरच मृत्यू झाला तर तुषार विलास भारंबे (वय ४० ) पूनम तुषार भारंबे वय ३८ वर्ष हे गंभीर जखमी झाले आणि उपचारा दरम्यान पूनम यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी दिली.ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली . या आवाजाने आजूबाजूचे लोक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली . तातडीने जखमीना बाहेर काढण्यात आले . घटनास्थळी पोलिसही पोचले होते . जखमींना तातडीने सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे तर मयत झालेले मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले . घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तातडीने भेट दिली. या घटनेचा तपास मोहोळ पोलिस ठाण्याचे अपघात पथकाचे अधिकारी अतुल क्षीरसागर हे करित आहेत .