मोहोळ : सामाजिक कार्याची आवड, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सेवाभावी वृत्ती यांची दखल घेत सौ.प्रीती राजन घाडगे यांची अखिल भारतीय छावा संघटनेच्या मोहोळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मोहोळ तालुक्यातील सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात महिला नेतृत्वाला नवी संधी मिळाली असून त्यांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक व्यापक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे-पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते प्रविण घाडगे -पाटील जिल्हाध्यक्ष गीताजली कदम सह पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. प्रिती घाडगे यांच्या निवडीमुळे मोहोळ तालुक्यात संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळण्यासोबतच महिलांचा सामाजिक आणि संघटनात्मक सहभाग वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे विविध उपक्रम, महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्नांवरील जनजागृती आणि संघटनात्मक विस्ताराला प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सौ. घाडगे यांच्या निवडीबद्दल मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Views: 8