सांगोला – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली इतिहासाची, गड-किल्यांची वैभवाची आणि दुर्ग संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने शिवप्रेमी मंडळ, शिवतीर्थ, सांगोला यांच्या वतीने भव्य किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ५ हजार रु प्रथम, ४ हजार रु द्वितीय, ३ हजार ५०० रु तृतीय, ३ हजार १०० रु चतुर्थ क्रमांक, २ हजार ५०० रु पाचवे, १ हजार ५०० रु सहावे तसेच सातवा क्रमांकसाठी १ हजार १०० रु बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी प्रताप इंगोले-९४२१०२८५१७, राजु चव्हाण-९७६५५९९८३८, माऊली गायकवाड-९८५०४४४६६९, प्रफुल्ल साळुंखे-९१६८२७५०२७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.