दिवाळीच्या शुभपर्वावर नांदेडकरांच्या सेवेत आणखी ५ नव्या बसेस दाखल झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नांदेड आगाराला नव्याने प्राप्त झालेल्या ५ ‘जिजाऊ’ बसेसचा लोकार्पण सोहळा आज आमदार बालाजीराव कल्याणकर आणि आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या पाचही बसेस आजपासून नांदेडकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. यावेळी आमदार साहेबांनी स्वतः बसमध्ये प्रवास करून बसेसचा अनुभव घेतला.
त्यावेळी माझ्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे,अभय देशमुख विभाग नियंत्रक नांदेड,अभिजीत कोरटकर आगार प्रमुख नांदेड,यासीन खान बस स्थानक प्रमुख,सचिनसिंह चौहान सहाय्यक वाहतूक अधीक्षक नांदेड,कैवल्य बासवाडेकर,बोधनकर,प्रभारक यांच्यासह आदी उपस्थित होते..
नांदेडकरांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, हाच या उपक्रमामागील उद्देश!
नांदेडच्या विकासासोबतच जनतेच्या सुविधांना प्राधान्य..!




















