मुदखेड – शेतीच्या जोड व्यवसायासोबत दुग्ध व्यवसायाची कास धरलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान रिद्धीश्री दूध संकलन केंद्राच्या वतीने करण्यात आला असून दिवाळीची अनोखी भेट देऊन दुष्काळाच्या सावटातून शेतकऱ्यांना सावरण्याची ताकद देण्यासाठी सुख-समृद्धीची आराधना करण्यात आली असून सामाजिक बांधिलकीचा उपक्रम कौतुकास्पद व प्रेरणादायी करत आहे.
रिद्धिश्री दूध संकलन केंद्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. १० नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेटीचे वितरण करण्यात आले आहे . शेती व्यवसायाला पूरक व नियमित आर्थिक उत्पन्नाचा आधार म्हणून दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय आहे . सातत्याने वर्षभर दुग्ध उत्पादक शेतकरी संकलन केंद्राला दूध पुरवठा करत असतात . या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाच्या आर्थिक व्यवहाराला हातभार लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाची दखल घेणे, सन्मान करणे , दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमागचा मुख्य उद्देश आहे . दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबतचे दिवाळीचे नाते व दिवाळी सारख्या मुख्य सणाच्या आनंदात सहभागी होता यावे या भावनेतून दिवाळी भेट देण्याची रिद्धीश्री दूध संकलन केंद्राने परंपरा जोपासली आहे.
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा टोपी ,दस्ती , व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले आहे . दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अल्पो आहाराचे आयोजन करण्यात आले होते . दुष्काळातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना सुख-समृद्धी मिळावी यासाठी सामूहिक महाआरती आराधना करण्यात आली . प्रतिष्ठित नागरिक गंगाधरराव आमदूरकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना जयस्वाल ,सेवा सहकारी सोसायटीचे संचालक शंकर लोमटे , सुधाकर आमदूरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी आम्रे, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष सतीश व्यवहारे यांच्या हस्ते दिवाळी भेट वस्तू देण्यात आली आहे. यावेळी रिद्धीश्री दूध संकलन केंद्राचे संचालक प्रताप देशमुख बारडकर, प्रतीक चवरकर , शेख शहबाज, गोविंद माळकोठे, विकास कत्रे , प्रशांत हंबर्डे , महेश राहेरकर , मुजम्मिल मोमीन यांची उपस्थिती होती . दुग्ध उत्पादक शेतकरी रवी सूर्यवंशी , मुक्तार पठाण , मारुती लोमटे , आसिफ पठाण , मुकुंद कोरबनवाड , दिलीप कोरबनवाड , सुरेश व्यवहारे , विजय व्यवहारे , माधव डांगे , प्रकाश पिल्लेवाड , प्रदीप फुलारी , साई बोंथले, परमेश्वर कटके यांच्यासहआदी दुग्ध उत्पादक शेतकरी उपस्थित होते .





















