हदगाव – भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणींना भावाकडून स्नेहाची भेट देण्याच्या भावनिक संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच लोकनेते आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून आमदार बाबुराव कदम कोहळीकर जनसंपर्क कार्यालय, हदगाव येथे सैनिकांच्या पत्नी व मातांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
सैनिक सीमेवर राहून देशाचे रक्षण करतात आणि देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्वावलंबन मिळावे, महिलांच्या हाताला काम मिळून त्यांच्या जीवनात आत्मविश्वास व समृद्धी निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या कडून हा उपक्रम राबविण्यात आला. देशसेवेसाठी समर्पित सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या सन्मानासोबतच महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न ठरला.
या उपक्रमांतर्गत शिलाई मशीनचा लाभ मिळालेल्या सैनिकांचे नावे पुढीलप्रमाणे
राम गायकवाड (लोहा), बालाजीराव चव्हाण (पळसा), संजय मस्के (पळसा), दारासिंग राठोड (पोतली तांडा), गोविंद निमडगे (पळसा), वेदांत चव्हाण (पळसा), उमेश भिसे (पळसा), वैभव शिंदे (चक्री), तुकाराम कापसे (पळसा), देवानंद सुकापुरे (डोंगरगाव), विकास कदम (कालेश्वर), राजेश दळवे (तळणी), अमोल होनमुने (चिंचगव्हाण), राजू निमडगे (पळसा), श्रीकांत पवार (मनुला), येशवंत हारळे (डोरली), प्रकाश बोडखे (पळसा), पंजाब पवार (अंबाला), प्रदीप सूर्यवंशी (कवाना), किशन सूर्यवंशी (कवाना), विनायक सूर्यवंशी (निवघा बा.), शामसुंदर पोगरे (हदगाव), नामदेव कोकने (डोरली), बालाजी वानखेडे (कोथळा), रंगराव लकडे (हदगाव), शंकर राठोड (हदगाव), शामराव यमकुरे (बरडशेवाळा), संदीप हूरदुखे (विठ्ठलवाडी चोरंबा), रामदास भुरके (कुसळवाडी), सुभाष चव्हाण (बामणी तांडा), प्रथमेश जाधव (हरडफ), नामदेव राठोड (पोतली तांडा), लक्ष्मण पवार (गोरगोटी), राम कौशल्य (लोहा), दत्ता श्रीमंगले (हडसनी), सोमनाथ नरवाडे (पळसा), विनोद मस्के (पळसा) व बापूराव काळबांडे (पळसा).
यावेळी गोपाल सारडा, अनिल पाटील बाभळीकर, संदेश पाटील हडसणीकर, बबन माळोदे,भास्कर वानखेडे, सुदर्शन पाटील, गजानन अनंतवार, नगरसेविका, नगरसेवक यांच्यासह स्वीय सहाय्यक बबन कदम ,मंचक कदम व प्रमुख पदाधिकारी सह कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.
भाऊबीजेच्या पवित्र पर्वावर आजी- माजी भारतीय सैनिकांच्या पत्नी व मातांच्या सन्मानार्थ राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, कृतज्ञता आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. देशसेवकांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि त्यांच्या स्वावलंबनाला बळ देण्याचा हा स्नेहपूर्ण प्रयत्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















