सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ दि. 16 नोव्हेंबर 2026 रोजी 229 गावे व 957 वाड्यांमधील 3 लाख 99 हजार 935 नागरिकांना व 1 लाख 95 हजार 297 पशुधनाला 229 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय 50 विहिरी व 32 बोअर असे एकूण 82 जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. राठोड यांनी दिली.
तालुकानिहाय मंगळवेढा 45 गावे – 58 टँकर, सांगोला 39 गावे – 55 टँकर, अक्कलकोट 27 गावे – 17 टँकर, माढा 16 गावे – 22 टँकर, बार्शी 17 गावे – 7 टँकर, करमाळा 16 गावे – 15 टँकर, माळशिरस 11 गावे – 11 टँकर, उत्तर सोलापूर 9 गावे – 16 टँकर, दक्षिण सोलापूर 7 गावे – 10 टँकर, मोहोळ 10 गावे – 17 टँकर असून पंढरपूर 1 गाव व 1 टँकर.
जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


















