करकंब – करकंबच्या भूमीला व त्यातील मातीला एक ऐतिहासिक वारसा असून त्याचा सुगंध असाच दरवळत रहावा, सांस्कृतिक,कला,क्रीडा,कृषी व शैक्षणिक क्षेत्राततही मोठा नावलौकिक असून हे सर्व जोपासण्याबरोबरच तो वाढविण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे मत सिने अभिनेते अजय तपकीरे यांनी व्यक्त केले.करकंब येथील टिळक चौकात करकंब फेस्टिवलच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी मानाचा समजला जाणारा करकंब भूषण हा पुरस्कार दत्तात्रय खंदारे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.तपकिरे यांच्या हस्ते चित्रकला,रांगोळी,नृत्य,होम मिनिस्टर,प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अमृता देशमुख (आरटीओ),पोलिस अधिकारी गीतांजली दुधाणे,पीएसआय वैभव शिंदे (पीएसआय),अनंत व्यवहारे (सपोनि) यांनीही मनोगते व्यक्त करुन करकंबच्या सूपूत्रांचा यथोचित सन्मान केल्याने वेगाळाच आनंद झाल्याचे सांगितले.