पिलीव – निरा खोऱ्यातील विर धरणातुन निरा डाव्या कालव्याद्वारे 10 नोव्हेंबर पासुन पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे माळशिरस, पंढरपूर व सांगोला या तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यंदा पाऊस अतिशय कमी झाल्यामुळे प्रचंड दुषकाळी परिस्थितीचा सामना या तालुक्यातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या भागातील ओढे, नाले, तलाव कोरडेच आहेत. खरीप हंगाम वाया गेलाच आहे त्यानंतर रब्बी हंगामात सुद्धा पाऊसच झाला नाही. माञ धरणक्षेत्रात थोडाफार पाऊस झाला आहे .यामुळे निरा खोऱ्यातील भाटघर, विर, देवधर, गुंजवणी या चार धरणात मिळुन 41,387 टीएमसी म्हणजेच 85.64 टक्के एवढा सध्या पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा तो कमी आहे पण दुष्काळी परिस्थितीत तेही उपलब्ध पाणी पिणयासाठी व शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा योजनांना याचा फायदा होणार आहे. तसेच जनावरांना पिण्यासाठी सुद्धा उपयोग होणार आहे. तर माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना हे पाणी उपलब्ध झाल्यामुळे चारा पिके यामध्ये मका ,कडवळ तसेच गहु, हरभरा ही पिके घेण्यास मदत होणार आहे. म्हणजेच या पाण्यामुळे पिण्याचे पाणी ,जनावरांचा चारा, शेतीसाठी पाणी उपयोगी पडणार आहे. 10 नोव्हेंबर ते 10 फेब्रुवारीपर्यंत हे आवर्तन सुरु राहणार आहे. यामुळे या विर धरणातुन सोडलेल्या पाण्यामुळे माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असुन रब्बी हंगामाला थोडासा आधार मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
चौकट _ शेतकऱ्यांनी रीतसर पाणी मागणी अर्ज भरुन सहकार्य करण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन.




















