पिलीव – सोलापूर जिल्ह्या परिषदेच्या सेस फंडातुन सन 2026_27 या आर्थिक वर्षांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी साहीत्य व उपकरणांच्या खरेदीसाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपञासह 25 नोव्हेंबर पर्यंत माळशिरस पंचायत समितीत टपाल विभाग ( आवक _ जावक) विभागात जमा करावेत असे आवाहन माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती मनीषा अमोल मदने पाटील यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत कडबाकुटटी यंञ, पेरणी यंञ, 5 एचपी व 7.5 एचपी पाणबुडी मोटार, थ्री पिस्टन स्प्रे पंप, 4 एच पी डिझेल इंजिन, बॅटरीवर चालणारे नेपसॅक सप्रे पंप, रोटावहेटर, ताडपञी, पलटी नांगर, स्लरी फिल्टर या साहित्याचा यामध्ये समावेश आहे. वाढत्या महागाईच्या काळात व दुषकाळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वाजवी किमतीत साहीत्य उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती मनीषा अमोल मदने पाटील यांनी केले आहे.