दुधनी : दुधनी येथील रहिवासी तथा लातूर जिल्ह्यातील नालेगाव येथील अल-फारूक उर्दू प्राथमिक शाळेचे सहशिक्षक सय्यद इस्माईल गुलाबसाब यांना प्रतिष्ठेच्या ‘राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून नॅशनल उर्दू टीचर्स युनियन (इंडिया) यांच्या वतीने दिल्ली येथील ‘गालिब अकॅडमी’मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी वासीलअली गुर्जर आणि राष्ट्रीय सचिव विकासकुमार राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत सय्यद इस्माईल यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पारंपरिक पोशाख प्रदान करून गौरविण्यात आले.
या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात देशातील ११ राज्यांतील एकूण ३६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रांतील शिक्षणतज्ज्ञांना ‘राष्ट्रीय उर्दू प्राध्यापक पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय उर्दू पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सय्यद इस्माईल यांना हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्याबद्दल शाळेतील शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी, पालक, हितचिंतक तसेच दुधनी परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना सय्यद इस्माईल म्हणाले, “हा सन्मान माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांचा आणि या परिसरातील नागरिकांचा आहे. मौलाना आझाद यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन उर्दू शिक्षणाच्या प्रसारासाठी मी यापुढेही समर्पित भावनेने कार्य करत राहीन.”
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















