वळसंग – आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री शावरसिद्ध हायस्कूल विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत असलेल्या अवधूसिद्ध रामण्णा कोळी(वय १२) या विद्यार्थ्याचा हायवा गाडी
क्र.MH १३ FB ६६९९ धडक रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवधूसिद्ध व काका काशिनाथ हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी परतत असताना त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या भारत बेंच हायवा या वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात अवधूसिद्ध आणि काका गंभीर जखमी झाला.अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी जवळच्या कुंभारी अश्विनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून मुलाला मृत घोषित केले आणि काका काशिनाथ गंभीर जखमी आहे.
अवधू शुद्ध अत्यंत हुशार, शांत आणि मनमिळावू स्वभावाचा विद्यार्थी होता. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून विभागीय अधिकारी राजेंद्र टाकणे, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे व इतर पोलीस पुढील तपास करत आहेत.
आचेगाव जवळील तिलाटि गेट येथील सिमेंट कारखाना आणि साखर कारखाना असल्याकारणाने गावच्या मध्यभागातून रस्त्याचा उपयोग होतो. दरवर्षी या गावात अपघाताची संख्या वाढत जात आहे यावर तोडगा काढावी तसेच मोठ्या जड वाहतूक गाडीसाठी गावच्या मध्यभागातून रस्ता बंद करून बायपास रस्ता करून द्यावे. आमचे प्राण संकट टाळावी असे गावकऱ्याकडून मनोगत व्यक्त होत आहे.
Views: 10