सोलापूर – सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर गेलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपला संप २६ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता स्थगित केला असून, आज गुरुवारी सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
उच्च न्यायालयातील ४ प्रशासकीय न्यायमूर्ती आणि चारही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले. हा संप मिटला नसून तूर्त स्थगित करण्यात आला आहे. याबाबत सोलापूर जिल्हा न्यायालयीन समस्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शाम राजेपांढरे (तृतीय श्रेणी), शकील शेख (लघुलेखक), सुकृत कुलकर्णी (चतुर्थ श्रेणी) व बेलिफ संघटनेचे सचिव सिद्धराम तोलनुरे यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना पत्र देऊन कळवले आहे, अशी माहिती सल्लागार महादेव विनायक गोटे यांनी दिली.
Views: 11