पंढरपूर – कार्तिकी यात्रेच्या तयारीच्या पाहणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. हा दौरा अटोपून परत जाताना त्यांच्या हेलिकाँप्टर मध्ये बिघाड झाल्याने ऐनवेळी त्यांना गाडीने पुण्याकडे रवाना व्हावे लागल्याची माहिती समोर आली आहे. अमन ऐव्हीऐशन या कंपनीचे ते हेलिकाँप्टर असल्याची माहिती समोर आलेली आहे.
कार्तिकी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर आलेले होते. या दौऱ्यात त्यांनी यात्रेच्या नियोजनाची पहिल्यांदा पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात त्यांनी पासष्ठ एकर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग (पत्राशेड) येथे भेटी दिल्या. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी देखील संवाद साधला. विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी यात्रे संदर्भातील कामांबाबत प्रशासनातील आधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. यावेळी यात्रे संदर्भातील कामांमध्ये काही त्रुटी किंवा ज्या उणिवा दिसून आल्या त्या बाबत संबंधित विभागाच्या आधिकाऱ्यांना सुचना देखील केल्या.
त्या नंतर पंढरपूरचा हा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकाँप्टरने परत जाण्यासाठी येथील हेलिपँडवर आले. परतीच्या प्रवासासाठी उपमुख्यमंत्री हेलिकाँप्टर मध्ये बसले देखील होते. मात्र हेलिकाँप्टर टेकआँफ (उड्डाण) घेऊच शेकले नाही. त्यावेळी ही बाब हेलिकँप्टर मधील पायलटच्या लक्षात आली. कारण हेलिकँप्टरचे एकच इंजिन कार्यान्वीत होत होते. दुसरे इंजिन कार्यान्वीत होत नव्हते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे हे खाली उतरले. त्यानंतर प्रशासनातील प्रमुख आधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. अखेर हेलिकाँप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून ते उड्डाण करु शकणार नाही या बाबतची खात्री झाल्या नंतर उपमुख्यमंत्री शिंदे हे पुढील प्रवासासाठी कारने पुण्याकडे रवाना झाले.
—————–
कोट
उपमख्यमंत्री एकनाथ शिंदेचे हेलिकाँप्टर सुरु होत नव्हते. त्यावेळी पायलटने सांगितले की हेलिकाँप्टरचे एक इंजिनच सुरु होत आहे, दुसरे इंजिन सुरु होत नाही. कारण त्या मधील बँटरी लो झालेली आहे. दरम्यान ती बँटरी पंढरपूर येथील लोकल मँकेनिककडे पाठविली होती परंतु ती बँटरी २४ व्होलटची तसेच लिक्विडेड बँटरी असल्यामुळे ती इथे चार्ज होवू शकली नाही. या बरोबरच त्याला जो कनेक्टर लागतो तो पंढरपूरात उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे बाय रोड (कारने ) पुण्याकडे रवाना झाले आहेत.
अभिजीत पाटील ( आमदार माढा मतदारसंघ )
Views: 13