मोडनिंब – पुणे विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा 14 वर्षे, 17 वर्षे व 19 वर्षे वयोगटातील मुला -मुलींच्या रिकर्व राऊंड व कंपाउंड राऊंड स्पर्धा आज अरण (ता. माढा) येथील यशोदा गुरुकुल येथे सुरू झाल्या. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ यशोदा गुरुकुलच्या संस्थापिका सुनीता रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभावती भारत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे, तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, यशोदा गुरुकुलच्या सीईओ समृद्धी रणदिवे, सावता घाडगे, आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू सोनल बुंदेले, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अभिजीत दळवी त्याचबरोबर पुणे,अहमदनगर,सोलापूर ग्रामीण, सोलापूर महापालिका , पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका आणि अहमदनगर महापालिका असे सात संघ आजच्या या स्पर्धेसाठी सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटना व यशोदा गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा दोन दिवस चालतील. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन आर्चरी कोच रमेश शिरसट यांनी केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















