आटपाडी – वीज निर्मितीनंतर समुद्राला सोडून दिले जाणारे १०० टीएमसी हून अधिक पाणी ग्रामीण भागासाठीच वापरात आणावे अशी आग्रही मागणी आटपाडीचे ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी केली आहे .
वीजनिर्मिती नंतर कोयनेतील समुद्राला वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईला नेण्याचा विचार राज्य शासन करीत असल्याच्या वृत्तावर भाष्य करताना सादिक खाटीक यांनी प्रसार माध्यमांद्वारे शासनाकडे ही मागणी केली आहे.
कोयनेच्या निर्मितीनंतरच्या सहा दशकात या वाया घालवल्या जाणाऱ्या पाण्यावर पुनर्वापराचे नियोजन केले जाणे महत्वाचे होते . कोयनेच्या पाण्यावर सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याचा प्राधान्याने हक्क आहे . भीमेच्या बॅक वॉटर क्षेत्रातील टाटांच्या ताब्यातल्या पुणे जिल्ह्यातील काही धरणांचे सुमारे ५० टीएमसी पाणीही वीजनिर्मिती नंतर कोकणातील नद्याद्वारे अरबी समुद्रात सोडून दिले जाते . यालाही शतकाचा काळ लोटून गेला आहे . हे ही ५० टीएमसी पाणी शेतीसाठीच वापरात आणण्यासाठी युद्धपातळीवरून प्रयत्न झाले पाहिजेत .
प्रत्येक कुटुंबाला ५००० घनमीटर इतके पाण्याचे समान वाटप करणारा बंदिस्त पाईपलाईनचा प्रयोग राज्याचा मुख्य उपक्रम बनविला गेला पाहिजे . अनेक जिल्हे, तालुक्यातून इतर काही राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग रस्ते जात असतानाही, शक्तीपीठ मार्ग सारख्या अनाठायी योजनांवर लाखो कोटी खर्च करायला उतावीळ झालेल्या शासनाने शक्ती मार्ग करण्याचे सोडून दिले पाहिजे .
पाण्याची नव निर्मिती करता येत नाही . निसर्गात असणाऱ्या पाण्याला मर्यादा आहे . मुळात पाण्यावरील वीज निर्मिती थांबविल्यास अन्य प्रकारातून वीज निर्माण केली जावू शकते . उदाहरणार्थ, कोळसा, अणु उर्जा, सौर उर्जा, पवन उर्जा, इत्यादी प्रकाराद्वारे वीज मिळविणे शक्य आहे . पाण्यावरील वीज निर्मिती थांबवल्यास एकट्या महाराष्ट्रात ३०० टीएमसी वाढीव पाणी सर्वांच्या भल्यासाठी सदैव उपलब्ध होईल .
काही दुष्काळी तालुक्यांच्या पृष्टभागाच्या १०० फुटा खाली सायपनने देता येऊ शकेल इतक्या उंचीवर कोयना धरण आहे . १०० टीएमसी क्षमतेचे हे कोयना धरण १५० टीएमसी क्षमतेचे करता येणे शक्य असल्यास ते केले पाहिजे . तसेच सांगली जिल्ह्यांतील खुजगाव – चांदोलीच्या वादात चांदोलीला झालेले धरण हे अंदाजे ३३ टीएमसी क्षमतेचे केले गेले आहे . तेच धरण खुजगांवला झाले असते तर ते १०० टीएमसीच्या वरील क्षमतेचे होऊ शकले असते . आताही खुजगावला धरण करण्यात शासन यशस्वी झाल्यास आणखी वाढीव ७० टीएमसी पाणी राज्याला नव्याने उपलब्ध होऊ शकते . हे सर्व खुजगाव, कोयनेतील वाढीव पाणी जीवसृष्टी संवर्धनासाठी वापरात आणले पाहिजे .
मोठ्या नद्यांच्या पात्रापासून दुष्काळी तालुक्यांच्या तळापर्यंत प्रचंड व्यासाच्या भुयारी कॅनॉल योजना अस्तित्वात आणल्या पाहिजेत . महापुराच्या काळात अनेक टीएमसी पाणी या भुयारी कॅनॉल मधुन शे – दोनशे किलोमीटर पर्यत आत गेल्याने आणि महापुराच्या पाण्याचा प्रचंड ताण कमी झाल्याने, सधन भाग पुराच्या नुकसानी पासून वाचणार आहे . आणि दुष्काळी तालुक्यांच्या तळात २०० – ३०० फुटा खाली शास्वत खात्रीचे पाणी भेटत असल्याने ते लाखो शेतकऱ्यांना उपसून – उचलून पाणी वापरणे अत्यंत सोयीचे ठरणार आहे . त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व धरणे, मध्यम प्रकल्प, मोठ मोठ्या तलावातील गाळ काढल्यास ही मानव निर्मित भांडी पुर्ण क्षमतेने पाणी साठवू शकणार आहेत याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा असे आवाहन ही सादिक खाटीक यांनी राज्यकर्त्यांना केले आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















