सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता विलास कोंडगुळे यांची जिल्हा परिषद मुख्यालयात बदली होऊन तब्बल चार महिने उलटले तरी त्यांनी पदभार सोडला नव्हता. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे ते दक्षिण पंचायत समिती बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कामकाज पाहत होते. “दैनिक तरुण भारतने” रविवारी २१ नोव्हेंबर रोजी या संदर्भात बातमी प्रसारित केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी उपअभियंता विलास लेंगरे यांना सहाय्यक अभियंता कोंडगुळे यांचे पदभार काढण्याचे आदेश दिले. “सहाय्यक अभियंता थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही भारी पडल्याची” बातमी प्रसारित झाल्यानंतर त्वरित सहायक अभियंता कोंडगुळे यांचे परिवार काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे “दैनिक तरुण भारत”च्या बातमीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दक्षिणचे सभापती संदीप टेळे व बीडिओ मनोज राऊत यांनी कोंडगुळे यांचा पदभार काढून घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही दक्षिणच्या उपअभियंत्यांकडून पदभार काढण्यास जाणीवपूर्वक चालढकल केली जात असल्याने अनेक गावातील नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होते . मात्र उप अभियंताकडून पदभार करण्यास टाळाटाळ करण्यात येत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशाल जैन यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. यामध्ये दक्षिण सोलापूर बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विलास कोंडगुळे यांचाही समावेश होता. त्यांच्या बदलीच्या आदेशाला चार महिने पूर्ण झाले तरी त्यांनी पदभार सोडलेला नव्हता . उलट, तालुक्यातील विविध विकासकामांचे आराखडे आणि मोजमाप पुस्तिका तयार करण्याच्या प्रक्रियेत ते अद्यापही सक्रिय असल्याचे दिसून आले.
पदभार काडण्याविषयी विचारणा केली असता, “वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पदभार काढणार ,” असे उत्तर उपअभियंत्यांकडून दिले जात होते . प्रशासनाच्या या टोलवाटोलवीच्या भूमिकेमुळे तक्रारदार आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. म्हणून सीईओ कुशल जैन यांनी सोमवारी उप अभियंता लेंगरे यांना आदेश देऊन कोंडगुळे यांचे पदभार काढण्यास सांगण्यात सांगितले आहे.
सोमवारपासून सहाय्यक अभियंता विलास कोंडगुळे यांचे पदभार काढणण्यात आल्याचे बांधकाम विभागाचे उपअभियंता विलास लेंगरे यांनी सांगितले .



















