अकलूज – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तालूकावार मतदान कळणार असल्याची भीती दाखवण्याचे काम कोणीतरी करीत असल्याचे माध्यमांतून समजले. परंतू मतदान कोणालाही समजत नसते. त्यामुळे मतदारांनी घाबरु नये.व मतदान करावे असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले. या बाबत लातूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालाची प्रत पत्रकारांना दाखवली.
मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगला येथ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले, काहीजन मतदान कळणार असल्याचे सांगतात.यावर त्यांनी लातूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकालाची प्रत दाखवत सोसायटी मतदारसंघ सोडून इतर सर्व मतदारसंघाचे संपूर्ण जिल्ह्याचे मतदान मोजले जात असल्याचे सांगितले. आणि जर मतदान समजत असेल तर याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घ्यावी अशा मागणीचा अर्ज त्यांच्याकडे केला असून त्याचे अद्याप उत्तर आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील सहकार सर्व जेष्ठ़ांनी सर्वांना सोबत घेऊन वाढविला. त्यांचा सन्मान राखला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील जनता स्वाभिमानी आहे त्यांचा स्वाभिमान जपण्याचा व वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहेत .
Views: 6