श्रीपूर – नेतृत्वगुण संप्पन्न असणारे पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार यांनी मी खासदार व्हावे म्हणून चांगले सहकार्य केले त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेले कार्य बहुमोल आहे अशा कर्मयोगी सुयाकरपंत परिचारक यांचे पुढील पिढीस प्रेरणा मिळण्यासाठी पंढरपूर मध्ये यथोचित स्मारक व्हावे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री खा . रामदास आठवले यांनी केले .
श्रीपूर येथे आरपीआय चे जेष्ठ नेते भारत आठवले यांच्या मुलाच्या लग्ना निमित्त ते श्रीपूर मध्ये आले होते .
या प्रसंगी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रशासकीय इमारती मध्ये कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते खा . रामदासजी आठवले यांचा भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले. यांनंतर झालेल्या वार्तालापात चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला .
याप्रसंगी माळशिरसचे आ . उत्तमराव जानकर , आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे , कारखान्याचे व्हा . चेअरमन कैलास खुळे , कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी ,आरपीआय तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, श्रीपूर , महाळुंग, बोरगांव , माळखांबी तेसेच माळशिरस तालुक्यातील आरपीआय चे पराधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
श्रीपुर मध्ये आगमन झाल्यावर फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये स्वागत करण्यात आले .त्यानंतर प्रथम मंत्री महोदय रामदासजी आठवले यांनी विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . याठीकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व स्मारक समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . तर छत्रपति चौकात जिगरबाज ग्रुप च्या खा . रामदासजी आठवले यांचा सत्कार करण्यात आला .
Views: 5