अक्कलकोट – मी व माझे संपूर्ण कुटूंब हे पिढीजात श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. माझे वडील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या स्वामी भक्तीतून आपण स्वामींचे भक्त बनलो, त्यामुळे
श्री समर्थांवर आपली अफाट श्रद्धा आहे. स्वामीभक्त या माध्यमातून आपल्याला अनेक वेळा स्वामींचे आशीर्वाद लाभलेले आहे, म्हणून आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वामींवर ठेवलेली श्रद्धा कधीच ढळू देत नाही असे भावोद्गार मा.आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी काढले.
नुकतेच मा.आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, वसंत नाना देशमुख,
माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अमोल बापू शिंदे, अस्मिताताई गायकवाड, अनिकेत देशमुख, मल्लिकार्जुन पाटील यांच्या समवेत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश मालक इंगळे यांच्या हस्ते मा.आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, वसंत नाना देशमुख, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व उपस्थित मान्यवरांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी वरील भावोद्गार काढले.
पुढे बोलताना मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की अक्कलकोटला वटवृक्ष मंदीरात आलं की मन आपोआप शांत होतं. इथे राजकारण, पद, प्रतिष्ठा सगळं बाजूला राहतं. इथे फक्त भक्त आणि स्वामी हे नातं उरतं. वटवृक्षाखाली बसल्यावर असं वाटतं की स्वामी आजही इथेच आहेत, आपल्याला पाहत आहेत, आपल्या पाठीशी उभे आहेत अशी प्रचिती येथे येते.
या देवस्थानचा विकास, इथली स्वच्छता, भक्तांसाठी केलेली व्यवस्था पाहून खूप समाधान वाटलं. मंदिर समिती मनापासून सेवा करत आहे. स्वामींच्या कृपेने सर्वांना सुख, शांती आणि समाधान लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना असेही मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी,
विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सागर दळवी आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Views: 8