पंढरपूर – गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला असा सुरू असलेला जयघोष व गुलाल बुक्क्याची उधळण करत महाद्वार काला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
येथील हरिदास घराण्यात महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. यामध्ये संत नामदेव महाराज यांची वंशज नामदास महाराज यांना मान आहे. गोपाळपूरच्या काल्यानंतर वारकरी महाराज मंडळी पंढरीचा निरोप घेतात, यानंतर स्थानिकांचा उत्सव म्हणून महाद्वार काला ओळखला जातो. हरिदास घराण्यातील संत पांडुरंग महाराज यांना सोळाव्या शतकात श्री विठ्ठलाने प्रत्यक्ष दर्शन देऊन आपल्या खडावा प्रसाद म्हणून दिल्या होत्या अशी आख्यायिका आहे.
दरम्यान बुधवारी परंपरेनुसार पांडुरंग महाराज हरिदास यांचे अकरावे वंशज मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडप यथे संत नामदेव महाराजांचे वंशज विठ्ठल महाराज नामदास, निवृत्ती महाराज नामदास यांनी मदन महाराज यांना खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. हा सोहळा चंद्रभागेचे वाळवंट, माहेश्वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस मार्गे काल्याच्या वाड्यात दाखल झाला. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी काल्याच्या सोहळ्यावर लाह्या, गुलाल, बुक्का याची उधळण केली.
यानंतर काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. महाद्वार काल्या नंतर खऱ्या अर्थाने कार्तिकी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















