काँरिडोरला विरोध करण्यासाठी येथील बाधित मंडळींकडून आजपर्यंत वेगवेगळ्या पातळीवर शासनाला हजारो निवेदने, हरकती देण्यात आल्या परंतु त्याचा काहीही विचार न करता, काहीही निष्पन्न न करता सरकार कॉरिडॉरची री ओढत आहे व जुलम जबरदस्तीने भूसंपादनाच्या नोटिसा काढल्या गेल्या आहेत. या नोटिसांना उत्तर देण्यासाठी म्हणून कॉरिडॉर बाधित नागरिकांनी या मार्चाचे आयोजन केलेले होते. विशेष म्हणजे या मोर्चाला डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्या विराट हिंदुस्थान संगम या हिंदू हितकारी लढाऊ संघटनेने पाठिंबा दर्शविला असून या संघटनेचे प्रवक्ते तथा उच्च न्यायालयातील वकील जगदीश शेट्टी हे खास मुंबईहून मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येथे आलेले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बचाव समितीचे प्रमुख नेते अभयसिंह कुलकर्णी इचगावकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितलेकी, संबंधित कायद्यांची पूर्ण पायमल्ली करून सरकार ह्या नोटीसा पुढे रेटत आहे. कॉरिडॉरमध्ये वारकरी आणि भाविक यांचं काहीही हित नाही. एक-दोन दिवसाच्या वारीचे निमित्त करून भरलेली बाजारपेठ पाडणे इष्ट नाही. कॉरिडॉरची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रात दुष्काळ आणि दुर्घटना वाढल्या आहेत. कॉरिडॉर हा महाराष्ट्राला अपशकुन आहे.
यावेळी बोलताना जगदीश शेट्टी म्हणाले, बाधितांनी घाबरून जाऊ नये, आपण रामसेतू ,नटराज, चिदंबर मंदिर यासारख्या अनेक लढे यशस्वी केले आहेत. पंढरपूर कॉरिडॉरची लढाई सुद्धा आपण यशस्वी करून दाखवू असे आश्वासन देत त्यांनी कायदेशीर बाबतीमध्ये बाधितांना मार्गदर्शन केले. शासन,प्रशासनाची चालू असणारी काँरिडोर बाबतची प्रक्रिया कायद्याला धरून नाही असेही त्यांनी सांगितले.
या मोर्चात बाधित कुटुंबांतील महिला,भगिनींसह कुटुंबातील लहानमुले, नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी अनेक बाधितांनी आपल्या हरकती देखील सादर केल्या. या मोर्चा मध्ये बाबाराव महाजन, ह भ प श्री.वडगावकर महाराज, माऊली महाराज गुरव, बालाजी महाजन, रा. पा. कटेकर, रामकृष्ण महाराज वीर,महिला आघाडी प्रमुख सौ. सुलभा वट्टमवार आदी मान्यवर उपस्थित होते. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी गणेश लंके, अनिल मिसाळ ,डॉ. प्राजक्ता बेणारे, गीतांजली पिंपळनेरकर,विनय लाड, आशिष राजहंस,विवेक बडवे, ओंकार कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
———————
चौकट : (घोषणांनी गेला परिसर दणाणून)
अशा प्रकारच्या घोषणा उत्साहाने दिला दिल्या गेल्या.






















