सांगोला – २६/११ शहीद दिनाचे औचित्य साधून शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना, सांगोला यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन तहसीलदार बाळूताई भागवत, पो.नि.राहुल देशपांडे, रेल्वे पो.नि.सुहास जाधव, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, वनसंरक्षक वनिता इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.निकीता देशमुख, दीपक बंदरे, कौशल्यादेवी शिंदे, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, आशाताई सलगर, रामभाऊ शिंदे, ऐश्वर्या देशपांडे, नवनाथ शिंदे, भागवत भाटेकर, प्रितीश मंठाळकर उपस्थित होते. या संघटनेच्या रक्तदान शिबिर उपक्रमातून आजपर्यंत ४ हजार ५०० रुग्णांना जीवनदान मिळाल्याने संघटनेचा उपक्रम प्रेरणादायी, कौतुकास्पद आहे, असे गौरवउद्गार तहसीलदार बाळूताई भागवत यांनी यावेळी काढले. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून समाजातील गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी तरुणांनी असेच पुढे येत राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद अशोक कामटे व शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या शिबिरात तरुणांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन १२९ जणांनी रक्तदान केले. रेवनील ब्लड बँक, सांगोला यांनी रक्त संकलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुंभार यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी ऍड.हर्षवर्धन चव्हाण, मकरंद पाटील, मुकुंद हजारे, मयूर ढोले, विनायक मस्के, तेजस कुरकुटे, सुयोग बनसोडे, प्रा.प्रसाद खडतरे, तोसिफ शेख , गणेश पाटोळे, अनिल तारळकर, प्रा.डॉ.गणेश पैलवान, संकेत नवले यांनी परिश्रम घेतले.
Views: 11