सोलापूर – दोन मोटार कारची समोरासमोर धडक झाल्यानंतर एका कारमधील सहा प्रवाशांना मारहाण केल्याची घटना सोलापूर वैराग रस्त्यावर वडाळा शिवारातील लोकमंगल कॉलेज समोर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली.
अमित विलास धडे (वय 39 वर्ष), सारिका अमित धडे (वय 35),आकांक्षा अमित धडे (वय 15 ), विलास अमित धडे (वय 15), विराज अमित धडे (वय 13, सर्व रा.तळे हिप्परगा सोलापूर) आणि आकाश प्रकाश डोलारे (वय 26 वर्ष, रा. बोरामणी नाका, सोलापूर) अशी मारहाण झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. वरील सर्व जण बुधवारी संध्याकाळी ईरटीगा मोटार कार (क्र एम एच 10 डीव्ही 1847) मधून वैराग कडून सोलापूरच्या दिशेने येत होते. वाटेत वडाळा येथील लोकमंगल कॉलेज च्या गेट समोर समोरून येणाऱ्या मोटार कार (क्र एम एच 13 डीएम 9167) ने त्यांना धडक मारली. अपघातानंतर तेथील तीन ते चार जणांनी मिळून कारमधील वरील प्रवाशांना मारहाण केली. त्यामुळे हे सर्व प्रवासी उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात रात्री साडेनऊ वाजता दाखल झाले.
Views: 9