मंगळवेढा – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मंगळवेढ्यातील मतदान केंद्रावर *९३ टक्के मतदान* झाले. सोसायटी आणि पणन मतदारसंघात *शंभर टक्के मतदान* झाल्याचे सांगण्यात आले. .
*मतदानाची आकडेवारी अशी -*
– एकूण मतदार : *१२२*
– मतदान केले : *११४*
– मतदान झाले नाही : *८*
– त्यापैकी *६ मतदार मयत* आहेत, तर *२ मतदार परगावी* गेल्यामुळे मतदान करू शकले नाहीत
– संस्था मतदारसंघात *६२ मतदारांनी*, तर पणन मतदारसंघात *९ मतदारांनी* हक्क बजावला
– दूध संस्था, पतसंस्था व इतर औद्योगिक मतदारसंघात *८ मतदान कमी* झाले
*अवताडे – चव्हाण यांची एकजूट दिसली*
तालुक्यातील सहकारी संस्थांवर ज्येष्ठ नेते *बबनराव अवताडे* यांची चांगली पकड आहे. तालुक्यातून खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष *सिद्धेश्वर अवताडे* हे डीसीसी बँकेसाठी यापूर्वीच *बिनविरोध* निवडून गेले आहेत.
आजच्या मतदानात बबनराव अवताडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सहकारी संस्था व इतर मतदार एकत्र आले. जिल्हाध्यक्ष *शशिकांत चव्हाण* यांच्या नेतृत्वाखाली *९८ मतदार एका रांगेत* मतदान केंद्रावर येऊन मतदान करताना चित्र हाेते.
प्रचाराच्या दरम्यान मंगळवेढ्यात झालेल्या सभेत दोन्ही गटाने परस्परविरोधी आरोप केले होते. निवडणुकीसाठी मोठी चुरस दिसून आली. मात्र, मतदान केंद्रावर ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, उमेदवार *दत्तात्रय खडतरे*, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती *सुशील आवताडे* हे एकमेकांशी राजकीय मतभेद विसरून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना विदारक चित्र दिसुन येत हाेते.
*निकालाची उत्सुकता*
निवडणुकीचा निकाल काय लागतो, याची उत्सुकता आहे. तालुक्यातून भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळणार, असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मात्र, एकूण जिल्ह्यातील निकालातून मंगळवेढ्यातून *दुसरा संचालक* होणार का? यावर सध्या अधिक चर्चा सुरू आहे.