Sunday, March 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चीट; दिल्ली पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 15, 2023
in india
0
पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चीट; दिल्ली पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल….
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपासाची सूत्रं वेगानं हलवण्यास सुरुवात केली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेक कांगोरे तपासले आणि आज अखेर राऊज एवेन्यू कोर्टात तब्बल हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे.

भारतीय कुस्ती परिषदेचे सर्वेसर्वा आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात पोक्सो नुसार दाखल गुन्ह्यासाठी समर्पक पुरावे आढळून येत नसल्यानं हे गुन्हे रद्द करावेत, अशी याचिका दिल्ली पोलिसांनी कोर्टाला केली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आज कुस्ती परिषदेच्या बृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणं अपेक्षित होतं. मात्र त्याऐवजी त्यांनी क्लोजर रिपोर्ट म्हणजे सबळ पुराव्याअभावी गुन्ह्याचा तपास बंद करण्याची अनुमती कोर्टाकडे मागितल्याची माहिती आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारलं होतं. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलं. त्यावेळी क्रीडामंत्र्यांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन कारवाई करण्याचं आश्वासन कुस्तीपटूंना दिलं होतं. तेव्हापासूनच दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपासाची सूत्रं वेगानं हलवण्यास सुरुवात केली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेक कांगोरे तपासले आणि आज अखेर राऊज एवेन्यू कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे.

दिल्ली पोलिसांची बृजभूषण सिंहांना ‘क्लीन चिट’
अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे. 7 कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दोन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 6 प्रौढ महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात राऊस अॅव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तर दुसरे आरोपपत्र पतियाळा न्यायालयात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलाने लावलेल्या आरोपांमध्ये दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांना क्लीन चिट दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी रोज अव्हेन्यू कोर्टात भारतीय कुस्ती परिषदेचे सर्वेसर्वा खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचे आरोपपत्र दाखल करण्यात येणार होतं. याच प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून ऑलिम्पिकपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वात जंतर मंतर येथे धरणे आंदोलन सुरु आहे. बृजभूषण यांच्याविरोधात दाखल तब्बल तीन एफआयआर प्रकरणी कारवाई होऊन त्यांना अटक करावी अशी मागणी हे कुस्तीपटू करत आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी कायमच त्यांना पाठीशी घालण्याची भूमिका घेतली आहे. यापूर्वी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना मारहाण करुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

बृजभूषण यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करावा, दिल्ली पोलिसांची कोर्टात विनंती
पोक्सो कायदा म्हणजे, अल्पवयीन पीडितेवर अत्याचार केल्याबद्धल गंभीर शिक्षेची तरतूद असलेला कायदा आहे. या कायद्यात जामिनाचीही तरतूद नाही. मात्र या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याइतपत सबळ पुरावे नसल्याचं सांगत दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात दिल्ली पोलिसांनी खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात पोक्सो कलमान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती केलीय. या विनंती अर्जावर 4 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर, त्याचा तपास करताना जेव्हा आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध करण्याइतपत सबळ पुरावे आढळत नाहीत तेव्हा पोलिसांकडून आरोपीविरुद्ध दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी कॅन्सलेशन रिपोर्ट कोर्टात सादर केला जातो. त्यावर सक्षम कोर्टात सुनावणी होते.

Post Views: 56
Previous Post

देशाच्या पायाभूत सुविधा झपाट्याने प्रगतीच्या मार्गावर !

Next Post

लातूरचा ‘नीट’पॅटर्न… 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
लातूरचा ‘नीट’पॅटर्न… 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स!

लातूरचा 'नीट'पॅटर्न... 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स!

ताज्या बातम्या

इराणच्या शाळेवर इझ्राईलने बॉम्ब टाकला ५१ विद्यार्थी ठार ६० जखमी.#youdh #mission #attck #iran #dubai

March 1, 2026

इराणचे सात देशावर हल्ले… #public #viral #america #pakistan #dubai #abudhabi

February 28, 2026

न्यू इंग्लिश स्कूल करकंब येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा. #public #viral

February 28, 2026

राजर्षी शाहू विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा. #public #solapurnews

February 28, 2026

विद्युत मोटारी व केबल चोरीशेतकरी त्रस्त..#public

February 28, 2026

भोकरदन मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा.. #public #solapurnews #solapurnews #viral

February 28, 2026

जोडधंदा केल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य नाही : आ. कराड. #public #marathinews #viral

February 28, 2026

रमेश किरगत यांचा सेवानिवृत्त सन्मान सोहळा.#public #marathinews #solapurnews #viral

February 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0710068

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697